रेल्वेच्या तीनही मार्गावर मेगाब्लॉक

_ मुंबई : रेल्वेच्या तीनही मार्गावर २३ फेब्रुवारीला मेगाब्लांक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर सीएसएमटी ते माटुंगा डाऊन धिमा मार्ग, हार्बरवर मानखुर्द ते नेरुळ दोन्ही मार्गावर आणि पश्चिम रेल्वेवर चर्चगेट मुंबई सेन्ट्रल दोन्ही धिम्या मार्गावर लांक घेण्यात येईल. मध्य रेल्वेच्या मख्य आणि पश्चिम रेल्वेवरील लोकल फेऱ्या पंधरा मिनिटे उशिराने धावतील, तर हार्बरवरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. __ मध्य रेल्वे : मुख्य मार्ग । कुठे- सीएसएमटी ते माटुंगा डाऊन धिमा मार्ग कधी- स. १०.५० दु. ३.२० वा. परिणाम - ब्लांक कालावधीत कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या धिम्या लोकल सीएसएमटी ते माटुंगा स्थानकादरम्यान जलद मार्गावर चालवण्यात येतील. लोकल भायखळा, परळदादर, माटुंगा स्थानकांत थांबतील. माटुंगानंतर पुन्हा जलद मार्गावरून धिम्या मार्गावर लोकल वळवण्यात येतील. हार्बर मार्ग कुठे- मानखुर्द ते नेरुळ दोन्ही मार्गावर कधी- स. ११.३० ते सायं. ४.०० वा. परिणाम - सीएसएमटी ते वाशी, बेलापूर, पनवेल दरम्यान दोन्ही मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. सीएसएमटी ते मानखुर्द दरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येतीलपश्चिम रेल्वे कुठे- चर्चगेट ते मुंबई सेन्ट्रल दोन्ही धिम्या मार्गावर, कधी- स. १०.३५ ते दु. ३.३५ वा परिणाम - ब्लांकमुळे धिम्या मार्गावरील लोकल चर्चगेट ते मुंबई सेन्ट्रल दरम्यान जलद मार्गावर चालवण्यात येणार आहेत.