खडकपाडा पोलीसांनी फसवणूक करणाऱ्या आरोपींना मोठया शिताफीने केली अटक

आरोपींना मोठया ठाणे : दिनांक २०/०३/२०१८ रोजी रामकृष्ण परशराम पवार, वय ६२ वर्ष, व्यवसाय डॉक्टर, राहणार रूम नं. ४०४, ए विंग, शेलार पार्क, खडकपाडा, कल्याण प.जि. ठाणे यांनी मार्च २०१६ मध्ये अमृत भिका बोरसे यांच्याशी माझी ओळख झाल्यानंतर त्याने मला तुम्ही तुमच्या क्लिनीकच्या माध्यमातून आदिवासी लोकांमध्ये चांगले काम करत आहात, त्यांना वैद्यकीय सुविधा देतात. मी तुम्हाला अनुसूचित जमाती राष्ट्रीय आयोगाचे (NCST) सदस्य म्हणुन तुमची नेमणूक करणार आहे. 


माझ्या ओळखीचे दिल्ली येथे राहणारे कुणाल नरेशशर्मा हे मोठे अधिकारी आहेत असे सांगून यांच्याशी ओळख करून देवून त्यांनी आपसात संगनमत करून मला भारत सरकारचे अशोक स्तंभाचे चिन्ह असलेले अनुसूचित जमाती राष्ट्रीय आयोगाचे (NCST) सदस्य या नावाने माझ्या नावाचे लेटर पॅड व नामपत्र (व्हिजीटींग कार्ड) अशी बनावट कागदपत्रे देऊनअनुसूचित जमाती राष्ट्रीय आयोगाचे (NCST) सदस्य नियुक्तीचे पत्र देण्याचे आमिष दाखवून माझ्याकडून दिनांक २०/०४/२०१६ ते दिनांक २४/०५/२०१६ पर्यंत रुपये १३,९०,००० (तेरा लाख नव्वद हजार रुपये) घेऊन माझी आर्थिक फसवणुक केली अशा प्रकारची तक्रार खडकपाडा पोलीस स्टेशन येथे दिली. या तक्रारीवरून सदर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नमुद गुन्हयाचे तपासात यातील आरोपी अमृत भिका बोरसे हा प्लॉट नं. ५२ बी, संतसेना नगर, ता. शिरपुर, जि. धुळे येथे भाडयाने रूम घेउन राहत असुन तो अहमदाबाद येथे पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली असता वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक जी.व्ही.तुंबडा, पोना/१४७४ शेले, पो.शि. ७६८३ आहेर, पो.शि. ७७७१ गरुड असे तपासपथक लागलीच धुळे जिल्हा येथे दिनांक २२/०३/२०१८ रोजी रवाना केले; सपोनि/ जी.व्ही. तुंबडा आणि पथकाने शिताफिने नमूद आरोपीस ताब्यात घेउन त्याने गन्ह्याची कबुली दिल्याने आरोपीच्या घराची घरझडती घेतली असता भारतीय राजमुद्रा असलेले अमृत बोरसे, रामकृष्ण परशुराम पवार यांच्या नावाचे बनावटलेटर पॅड, भ्रष्टाचार निर्मलन समितीचे बनावट ओळखपत्र, भारत सरकार' असे नाव असलेली फोर व्हिलर गाडीची नंबर प्लेट, Ministary of Micro small and medium Enterprises च्या ५१ प्रती, तसेच विविध बँकाची पासबुक जप्त करण्यात आली आणि त्यावरून आरोपी अमृत भिका बोरसे यास अटक करण्यात आली व त्याचाकडे सखोल विचारपूस केली असता त्याने त्याचा साथीदार आरोपी कुणाल नरेश शर्मा हा दिल्ली येथे राहत असल्याचे सांगितले. त्यावरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक जी.व्ही.तुंबडा, व वर नमुद कर्मचारी यांनी मनिष मॉल, सेक्टर, नं. २२ समोर, दिल्ली येथे आरोपी येणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्याने दिनांक २६/०३/२०१८ रोजी सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले व त्यास विश्वासात घेवून सखोल विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने आरोपी कुणाल नरेश शर्मा यास अटक करण्यात आली असुन गुन्ह्याचा पुढील तपास सुरु आहे. सदर गुन्ह्याचा तपास परमबिरसिंग पोलीस आयुक्त, ठाणे शहर, मधुकर पाण्डेय, सह पोलिस आयुक्त ठाणे, शहर, डॉ.प्रताप दिघावकर, अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग कल्याण, डॉ. संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ३ कल्याण, दत्तात्रय कांबळे, सहा. पोलीस आयुक्त कल्याण विभाग कल्याण, व बाळासाहेब कदम वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडकपाडा पोलीस ठाणे, यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.